Saturday, 28 June 2014

६ जून २०१४ आमचा प्रवास सुरु झाला रायगडचा दिशेने.....

 

६ जून २०१४ पहाटे ३ वाजता उठ्ठून आवरून मी माझे मित्र संघर्ष, सुहास, अजिंक्य रायगडचा दिशेने राज्याभिषेक दिनासाठी निघालो. आज मी पहिल्यांदाच रायगडावर राज्याभिषेक सोहळा कसा साजरा होतो हे पाहणार होतो, सकाळी हवाही खूप छान होती, आमचा प्रवास सुरु झाला रायगडचा दिशेने जाताना भोर पासून महाड पंढरपूर हायवे ने आम्ही रायगड कडे निघालो जात असताना या रस्त्यावर वरंध चा घाट लागतो. या घाटामध्ये चहा आणि भाजी विकणारे लोक आहे, आणि इथ थांबलो कि समोर निसर्गाचा अप्रतिम नजारा दिसतो. इथल्या चहा आणि गरम गरम भाज्जना वेगळीच चव आहे. आम्ही चहा भज्जी खाउन आमचा प्रवास पुढे सुरु केला. रायगडचा पाय्त्थ्याला पोहचणार त्या आधीच ५ किलोमीटर माणसांची गर्दी दिसू लागली सगळीकडे बघवे झेंडे घेऊन जय भवानी जय शिवाजी घोषणा देणारे कार्यकर्ते दिसत होते, एरवी शांत असलेला रायगड आज मात्र गजबजून निघाला होता. आम्ही गड चढण्यास सुरवात केली, रायगड चढायला तसा सोपा पण अंतर बरच लांब असल्यामुळे अर्ध्यात गेल्यानंतर आमचा अंगातून घामचा धारा वाहू लागल्या. बरोबर आणलेलं पाणी पण संपत आले होते. आम्ही नंतर थोडे थांबत थोडे बसत गड चढायला सुरवात केली आणि बघता बघता मुख्य दरवाजा जवळ पोचलो. पुढे गेल्यावर नागारखाण्या समोर फडकणारा झेंडा दिसला आणि पावले आपोआपच गती घॆउ लागली, कारण पहायचा होता राजायाभिषेक सोहळा. आम्हाला जायला उशीर झाल्यामुळे राज्याभिषेकाचा सोहळा आम्हाला पाहवयास नाही मिळाला.त्यामुळे मन थोडे नाराज झाले. पण नगारखान्या समोर फडकणारा तो भगवा झेंडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला केलली सजावट पाहून अंदाज एत होता कि किती मोठा सोहळा पार पडला असेल राजांचा. आम्ही महाराजांचा दर्शनासाठी गेलो आणि जणू महाराज सत्यात आमचा समोर आहेत असेच भासू लागले, किती थोर असेल हा राजा आणि किती भाग्यवंत असतील ते लोक ज्यांना महाराजान बरोबर काम करायला राह्यला मिळाले असेल. एका गोष्टीच वाईट वाटत कि आपले सरकार आपली हे इथसिक वास्तू जतन करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. नंतर आम्ही पुढे जाग्दिश्वरचा मंदिराकडे जाण्यासठी निघालो पण पुरेसा वेळ नसल्याने आम्ही टकमक टोक पाहून परतण्याचा निर्णय घेतला. टकमक टोकावरून दिसणारे ते निसर्गच सुंदर रूप डोळ्यात साठवून आम्ही घराकडे निघालो.
 ही माझी पहिलीच राज्याभिषेक सोहळ्याल जाण्याची वेळ होती, सोहळा न पाहता परत आल्याने आम्ही ठरवल पुढचा वेळेस एक दिवस आधीच जावून हा सोहळा नक्की पहायचा...
जय भवानी......!
 जय शिवाजी....!!
जय जिजाऊ.....!!!
 जय शंभूराजे....!!!!!

1 comment:

  1. So finally you got your platform to express your tales huhh.... !
    And nice quotes. . :-)
    Keep it up . .

    ReplyDelete