Tuesday, 12 August 2014

एक चिम्ब प्रवास सह्याद्री च्या कुशितला..

पावसाळा सुरु झाला कि वेध लागतात ते कुठ तरी फिरयला जाण्याचे आम्ही सगळे मित्र गेले २ वर्ष झाले पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो होतो. या वर्षी हे आम्ही फिरयला जाण्याचा प्लान तयार करत होतो. प्रत्येक जन वेगवेगळ्या ठिकाणांची नावे सांगू लागला. आम्ही प्लान केला या वेळेस आपण आंबोलीला आणि दुधसागर


धबधबा पाहायला जायचं. पण तो प्लान यशस्वी नाही झाला. आणि ८ ऑगस्ट २०१४ संध्याकाळी अचानक प्लान ठरला उद्या वरंध घाटामध्ये फिरयला जायचं. आम्ही ६ मित्र आणि आमचा ३ बाईक ९ ऑगस्ट २०१४ सकाळी ९ वाजता आम्ही सगळे वरंध घाटाचा दिशेने निघालो जाताना भोर ला पोचल्यानंतर आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. चहा घेतला आणि पुढचा प्रवास सुरु केला. तसा वरंध घाट हा अम्चासाठीचा नवीन रस्ता न्हवता. खुपदा या रस्त्याने जाऊनही नेहमी हवा हवासा वाटणारा हा रस्ता जणू बोलक्या निसर्गाच्या सानिध्यात घून जाणारा वाटतो. मी खुपदा या रस्त्याने गेलो पण असे कधीच वाटल नाही कि आता या रस्त्य्ने जायचा कंटाळा आलाय. जात असताना या रस्त्यावर पहिले भाटघर धरण दिसते नंतर नीरा देवधरच धरण दिसत.
   आज पाऊस हि कमी होता मस्त उन पावसाचा लपंडाव सुरु होता. या उन पावसात भिजत त्याचा आनंद घेत आम्ही वरंध घाटात केव्हा पोचलो समजलच नाही. वरंध घाटामध्ये एक असे ठिकाण आहे कि त्या वळणावर आल्यावर कोणी थांबणार नाही असे होतच नाही. समोरच उंचच उंच डोंगर त्या मधून ते कोसळणारे धबधबे पहिले कि निसर्ग किती सुंदर आहे हे समजते. मी माझा पहिल्या ब्लोग मध्ये पण उलेख केला होता कि इकडची भाजी खूप छान असतात. आम्ही भाजी खात खात समोरचा निसर्गाचा आनंद घेत होतो. तेवढ्यात बोलत असतानाच सुहास म्हणाला इकडन खाली जाऊन प्रतापगड महाबळेश्वर वाई मार्गे घरी जाऊयात आणि लगेचच सगळे हो हि म्हणाले. मस्त धुकाय्न मधून वाट काढत आम्ही वरंध चा घात उतरू लागलो. जात असताना इतके सुंदर सुंदर धबधबे दिसत होते कि जणू असे वाटत होते कि यांची एकमेकान मध्ये जणू स्पर्धा चालू आहे. एका पेक्षा एक उंचावरून कोसळणारे धबधबे पाहून मन अगदी थक्क होत होते. वरंध चा घाट संपला आणि आम्ही पहिल्यांदाच वेगळा हवामानाचा अनुभव घेतला बारीक पाऊस पडत होता आणि गरम उबदार हवा समोरून एउन अंगाला स्पर्श करत होती. त्या वातावरणात इतक छान वाटत होते ते मी शब्दात नाही सांगू शकणार कारण काही गोष्टी या सांगण्या पेक्षा अनुभव घेण्यात काही वेगळीच मजा असते.          पोलादपूर पासून प्रतापगडला जायला रस्ता आहे आम्ही या रस्त्याने निघालो जात असताना याही बाजूला खूप उंच उंच डोंगर दिसत होते त्या मधूनही धबधबे कोसळत होते. पावसाच प्रमाण थोडे कमी असल्याने त्या मधून पाणी थोडे कमी वाहत होते. या घाट रस्त्याने जात असताना पाऊस सुरु झाला आणि आम्ही त्या मध्ये पूर्णपणे भिजलो. पावसाचे थेंब थोडे मोठे असल्यामुळे ते जोरजोरात आम्हाला लागत होते. याही घाटामध्ये आम्हाला धुक्यान मधून रस्ता शोधत गाडी चालवावी लागली. पुढे आल्यावर आम्ही जो आमचा प्लानचा मुख्य उदेश होता कि मनसोक्त दाब्धब्या मध्ये भिजायचं त्या साठी तयार झालो. आणि २ वर्षापूर्वी ज्या धबधब्या मध्ये आम्ही मनसोक्त भिजलो होतो त्या मध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनसोक्त भिजलो. भिजत धुक्यान मध्ये गाडी चालवत आम्ही महाबळेश्वरला कधी पोचलो ते हि समजले नाही. महाबळेश्वरला आल्यावर पुन्हा चहा घेतला. आणि आम्ही घरचा दिशेने निघालो.
        आम्ही पावसात धाब्धब्यान खाली भिजण्यात एवढे मग्न होतो कि आम्ही दुपारच जेवण हि केल नाही. आणि खरच निसर्गाच एवढ सुंदर रूप पाहता पाहता तहान भूक कशाकडेच लक्ष जात नाही. सह्याद्री पाहावा पावसातच, हिरवेगार गालिचे मधूनच पडणारा पाऊस, कोसळणारे धबधबे अगदी मनाला वेड लावून जातात.

1 comment:

  1. One of our most amaziiiiiiiiiiing Exp. Again from "SAHYADRI".

    ReplyDelete