खूप दिवस झाले ट्रेकिंग ला जायचा विचार चालू होता पण रोजच कामामुळे वेळ काही मिळेना. एक दिवस कल्पेशला कामा निमित्त भेटलो आणि बोलता बोलता विषय निघाला ट्रेकिंगचा, तो म्हणाला ६ मार्च ला माझे मित्र आणि आम्ही भैरवगड ट्रेकला चालोय जर तुला यायचं असेल तर चल. मी पण न विचार करता लगेच हो म्हणलो. ट्रेकिंग फिरन मला खूप आवडत त्यामुळे मी माझा ओळखीचे कोणी नाहीत तरी मी चालोय याचा विचारपण माझा मनात आला नाही. डोक्यात विचार होता तो फक्त ट्रेक ला जायचा निर्गाचा सानिध्यात एक पूर्ण दिवस घालवायचा. लगेच google वर भैरवगडची माहिती वाचली. जतनाचा संपूर्ण रस्ता अभयारण्यातून आहे वाचल्यावर मनात अजूनच उत्सुकता लागली प्राणी दिसतील. घनदाट जंगल असेल आणि अपेक्षे प्रमाणे या गोष्टी पाहायला मिळाल्या.
रविवार ६ मार्च २०१६ सकाळी ४.३० वाजताच मी उठून आवरायला सुरवात केली, जेव्हा कधी हि फिरायला ट्रेकिंगला जायचं असेल तेव्हा मी उशिरा झोपतो आणि लवकर उठतो कारण येणाऱ्या दिवसाच्या आठवणी मधेच मी आधीचा दिवसापासूनच गेलेलो असतो. त्या आठवणी मध्ये झोपच लागत नाही. सकाळी ६.३० ला बस मध्ये बसलो सगळे नवीन होते फक्त कल्पेशच ओळखीचा पण "असे म्हणतात जर तुम्हाला फिरायची आवड असेल तर तुम्ही एकटे जरी गेलात तरी तुमचा सारखीच अजून आवड असलेली लोक तुम्हाला रस्त्यात भेटतात" आणि त्याप्रमाणेच बस मध्ये हि मला भेटले . सातारा मध्ये नाष्टा करयला थांबलो आणि सगळ्यांशीच ओळख झाली. दुपारी १२.३० ला आम्ही पायथ्याला गाव होते तिथ पोचलो. रस्ता दाखवायला त्या गावतल्या एका माणसाला आम्ही बरोबर घेतले आणि चालयला सुरवात केली. एक छोटा टप्पा पार केल्यानंतर समोर डोंगर दिसला आणि घनदाट झाडीही तेथूनच सुरु झाली होती, पहिला टप्पा पार केल्यानंतर एक छोटी गुहा दिसली. पावसाळ्यामध्ये प्राणी या घुए मध्ये राहत असतील.घुहेचा वरचा बाजूने थोडा पाण्याचा पाझर एत होता. गुहे पासूनच पुढे दुसरा टप्पा सुरु झाला एकदम उभी चढण वरती आलो आम्हाला असे वाटल आला गड पण गड तर बराच लांब होता. पुढे गेल्यावर एक झरा लागला, fridge पेक्षाही जास्त थंड पाणी पायला मिळाले. वाहत्या थंड पाण्याचा त्या झऱ्याच पाणी पिउन पुढे निघालो. आता अगदी घनदाट जंगलातून आम्ही चाललो होतो. पक्षांचा आवाज सोडला तर बाकी काहीच नाही. सगळी कडे शांतता. अगदी मन प्रस्सन होईल अशी. चालत असताना एका ठिकाणी त्या झाडीतून बाहेर आलो आणि समोर उंच दोन डोंगर दिसले आणि आम्ही उभे होतो तो डोंगर उतरून आम्हाला समोर जायचं होते. खाली पुन्हा घनदाट झाडी होती. आम्ही उतरायला सुरवात केली आत्ता पर्यंत आलो त्यापेक्षा हि झाडी अजून घनदाट होती. रातकिड्यांची कीर कीर सुरु होती. सूर्यप्रकाशही कुठ दिसत न्हवता एवढी घनदाट झाडी. उतरल्यावर पुन्हा एक झरा लागला. इथेही एकदम थंड पाणी होते. पाणी पिलो आणि पुन्हा चालयला सुरवात केली. आता शेवटचे दोनच टप्पे राहिले होते. एक टप्पा पार केला आणि आम्हाला रान गवे दिसले. सकाळ पासून एक हि प्राणी दिसला न्हवता तो रान गवे पहिले आणि आल्याच सार्थक झाल्या सारख वाटल.नंतर पुढे शेवटचा टप्पा पार केला आणि आम्ही भैरवगडावर आम्ही पोचलो. इथे भैरवनाथाच मंदिर आहे. मंदिराचा बाजूला खोल दरी आहेत. आणि तेथून दिसणार निसर्ग खूपच सुंदर आहे. मंदिरात जाऊन भैरवनाथाच दर्शन घेतल थोडा आराम केला. सकाळी १२.३० ला चालायला सुरवात केली होती मंदिरा जवळ पोचायला आम्हाला ५.३० वाजले ५ तास चालल्या नंतर आम्ही भैरवगडावर पोचलो होतो. जवळ जवळ २५ किलोमीटर अंतर डोंगर दर्यांमधून घनदाट जंगलामधून पार केल होते. पोचल्या नंतर एक वेगळाच आनंद प्रत्येकाचा चेहऱ्यावर दिसत होता. आणि ट्रेक पूर्ण झाला या आनंदात परतीचा प्रवास सुरु झाला.

No comments:
Post a Comment