


शिवराज्याभिषेक सोहळा म्हणल कि वेध लागतात ते ६ जूनचे. गेल्यावर्षी ६ जून २०१४ ला आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी गेलो पण जाण्यास उशीर झाल्यामुळे सोहळा पाहण्यास मिळालाच नाही. त्यमुळे या वर्षी ६ जून २०१५ ला एक दिवस आधीच जायचं असे ठरवल होते. त्याप्रमाणे आम्ही ५ जूनला सकाळी १० वाजता घरून निघालो. सगळे एकमेकांना रस्त्यातच भेटले. आणि भोर पासून आमचा एकत्र प्रवास रायगडचा दिशेने सुरु झाला. या वेळेस जाताना डोक्यात खूप विचार होते. कसा असेल कार्यक्रम, काय काय पाहायला मिळेल याची उत्सुकता लागली होती. जाताना भोर वरंध घाट महाड रोड अगदी रोजचा असल्या सारखाच भासत होता. पण कंटाळवाणा कधीच वाटत नाही. घाटाच्या मध्यावर असलेल्या डोंगर दर्याचे प्रत्येकवेळेस वेगळेच रूप दिसते. तिकडे थोडे थांबून आम्ही पुढे जाण्यास निघालो. संध्यकाळी ४ वाजेपर्यंत आम्ही पाचाडला पोचलो. जिजाऊ मासाहेबांचा समाधीला नतमस्तक होऊन आम्ही रायगड चढण्यास सुरवात केली. या वेळेस सुरवातीला दुसर्या मार्गाने गेलो. आणि नंतर नेहमीचा रस्त्याने चढण्यास सुरवात केली. रायगड चढण्यास तसा सोपा आहे पण अंतर व थोडी उभी चढण असल्यामुळे थोडा वेळ लागतो. गेल्यावर्षी आमचा जवळच पिण्याचपाणी लवकरच संपल्यामुळे थोडा त्रास झाला. त्यामुळे या वर्षी प्रत्येकानं स्वताला पुरतील एवढ पाणी घेतल होते. एक दिवस अगोदर एनारे बरेच शिवभक्त होते. बघता बघता आम्ही महादरवाजा जवळ पोचलो. आम्ही दुपारी जेवन न केल्यामुळे भूक लागली होती. महादरवाजा चा वरचा बाजूला बसून आम्ही जेवण केल. आणि पुन्हा गड चढण्यास सुरवात केली. होळीचा मालावर पोहोचलो आणि समोर बघितल तर जसे लग्नात किवा कार्यक्रमात रंगीत लाईट चे फोकस लावतात तसे राजमहाल, व राजसद्रेवरचा महाराजांचा मूर्ती जवळ लावले होते. हार फुलांनी महाराजांची मेघडंबरीतील मूर्ती सजवली होती. राजसदरेवर पोवाड्यांचे कार्यक्रम सुरु होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात एका मुलीने महाराणी ताराबाईचा पोवाडा सादर केला. एक मुस्लिम शाहिराने देखील एक पोवाडा सादर केला. त्याने सुरवातीलाच नाव सांगताना म्हणाला मी जातीने मुस्लिम आहे शरीराने माणूस पण रक्ताने मराठा आहे. रात्री ११ ते १२ पर्यंत आम्ही कार्यक्रम बघितले. गड चढून दमल्यामुळे आम्ही आराम करण्यासाठी बाजारपेठेकडे गेलो. बाजारपेठे मध्ये आम्ही झोपलो. रात्रभर गडावर शिवभक्तांची ए जा सुरूच होती. जगदीश्वराचा मंदिराकडे कोणी जात होते कोणी राजसद्रेकडे रात्रभर गड माणसांनी गजबजला होता. सकाळी ६ वाजता आम्ही उठलो सगळे आवरून आम्ही राजसदरेवर गेलो. सकाळी सुद्धा कार्यक्रम सुरु होते. एक तरुण वक्ता महाराजांचा इतिहास सांगत होता. पुढे नगारख्ण्याजवळ ढोल ताशांचा गजर चालू होता. पुण्यातील शंभू गर्जना ढोलताशा पथकातील तरुण तरुणी ढोल वाजवत होते. त्या ढोल ताशाचा तालावर हजारो शिवभक्त नाचत होते.
शिवभक्तानी साप्त्नाद्यांचे पाणी राज्याभिषेकासाठी आणले होते. काही शिवभक्तानी सिधुदुर्गवरील महाराजांचा पायचे ठसे असलेली प्रतिमा घेऊन आले होते. सरदार, मावळ्यांचा पोशाखातले अनेक तरुण एत होते. नंतर जादिश्वाराची पालखी राजसदरेवर आली. मासाहेब जिजाऊ ची पालखी देखील आली. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे भोसले यांचा हस्ते महाराजांचा चांदीचा मूर्तीला अभिषेक करण्यात आला. महाराजांचा मेघडम्ब्रीतील मूर्तीला सुवर्ण नाण्यंचा अभिषेक करण्यात आला. त्या नंतर युवराज संभाजीराजेंनी आपले मनोगत व्यक्त केल. ते सांगत होतेकी सरकार कडून त्यांना पत्र आलाय कि रायगडवरची ती मेघडम्ब्रीतलि मूर्ती काढा. ऐकून खूप वाईट वाटल कसे असे आपले राजकारणी सरकार का विरोध करत नाहीत अशा गोष्टीन साठी. ज्यांचा नावाने राजकारण करतात त्यांचीच मूर्ती हटवण्याच पत्र पाठवता. निषेध असो असल्या सरकारचा आणि लोकांचा.
शिवराज्याभिषेक सोहळा पहिला आणि जसे गेल्या शिवराज्याभिषेक सोहळाला ठरवल होतकी पुढचा वेळेस एक दिवस अगोदर जायचं तसे या वेळेस ठरवल कि प्रत्येक शिवराज्याभिषेक सोहळ्याला यायचं. महाराजांना मुजरा करून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. गड उतरण्यास जेवा सुरवात केली तेव्हा इतकी प्रचंड गर्दी होती कि मुग्यांची जशी गर्दी असते तशी गर्दी त्या पायवाटेवर झाली होती वर पासून ते अगदी तळापर्यंत माणसांची गर्दी होती. कित्येक वर्ष झाली तरी महाराजान बद्दलच असणार जनमानसान मधल प्रेम त्या वेळी दिसल. गडाचा पाय्थ्य्पासून १० ते १५ किलोमीटर वाहनांची गर्दी होती. काही लोक कार्यक्रम झाल्या नंतर सुद्धा गडावर जात होते.
एतना पुढचा शिवराज्याभिषेक सोहळ्य पर्यंत पुरतील एवढ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आठवणी घेवून आलो.
जय जिजाऊ...!! जय शिवराय...!! जय शंभूराजे..!!
No comments:
Post a Comment