Tuesday, 28 October 2014

राजांचा गड गडांचा राजा राजगड...!!

खूप दिवस झाले राजगडला जायचं असा प्लान आम्ही सगळे मित्र करत होतो पण त्यासाठीचा दिवस मात्र ठरत न्हवता. शेवटी दिवाळीचा सुट्टी मधला शेवटचा रविवार ठरला. आणि आम्ही १० मित्र २६ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ७ वाजता राजगडचा दिशेने निघालो. राजगडावर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत त्यातला जास्त अवघड नसलेला पालीचा दरवाजा. या दरवाजा मार्गे गडावर जायचं असेल तर पहिल्यांदा पाली गावात पोचाव लागत तेथूनच या मार्गाची सुरवात होते. भोर वरून भुतोंडे या गावात आल्यावर त्य्ही बाजूने आपणास गडावर जाता एते या मार्गाने आल्यास आपण आलू दरवाजा मार्गे गडावर पोहचतो. गुंजवणे गाव मधून गेल्यास आपण गुंजवणी दरवाजा मधून गडावर प्रवेश करू शकतो व पुढे पद्मावती माचीवर पोचतो. 
      थोडा अवघड असणारा पण दुर्गप्रेमीना आवडणारा मार्ग चोर दरवाजा, चोरदरवाजाने  जर गडावर प्रवेश करयचा असेल तर साखर गाव पासून पुढे ३ किलोमीटर गेल्यावर या मार्गाने जाता एते. राजगड हि मराठांच्या स्वराज्यची पहिली राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी २६ वर्ष त्यंचा राज्यच कारभार या गडावरून चालवला 
राजगडावर पाहण्या सारख्या दोन भव्य माची आहेत एक सुवेळा माची आणि दुसरी संजीवनी माची संजीवनी माचीची लांबी हि जवळ जवळ २ किलोमीटर आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे असणारा बालेकिल्ला बाले किल्ल्यावर जाण्यास थोडी कठीण वाट आहे पण एकदा वरती पोचल्यावर त्य वरती चढण्यासाठी घेतलेल्या परीश्रामचे सार्थक झाले असे वाटते कारण या वरून निसर्गाचे इतके अप्रतिम रूप दिसते कि ते शब्दाद सांगण्या सारखेच नाही ते अनुभवण्यासाठी प्रत्येकाने एकदातरी तेथ गेलेच पाहिजेल. बालेकिल्ल्यावरून सिहगड, पुरंदर, तोरणा, रायगड, लिंगाणा, लोहगड हे किल्ले दिसतात.
अशा या गडावर जाण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो. आम्ही सुद्धा गडावर जाण्यासाठी चोर दरवाजाचीच निवड केली. हवामान पावसाळी झाल्यामुळे सगळीकडे दुखच दुख पसरले होते. दुख्या मधून वाट काढत आम्ही निघालो. हि आमची पहिलीच वेळ असल्यामुळे किती अंतर वरती चढत जायचं याचा अंदाज कोणालाच न्हवता. बरेच अंतर चालल्या नंतर एकदम उभी चढण आली. दगडी मध्ये छोटय पाह्य्र्या कोरलेल्या या पाह्य्र्या चढून वरती आलो आणि एक छोटा दरवाजा समोर आलो त्यातून आत प्रवेश केला आणि आम्ही पद्मावती माचीवर पोचलो. याच त्या छोट्या दरवाजाला चोर मार्ग असे नाव आहे. पद्मावती माचीवर पद्मावती मतेच मंदिर आहे, बाजूलाच रामेश्वरच देखील मदिर आहे. आम्ही सगळे पद्मावती मातेचा मंदिरात बसलो. गड चढल्या नंतर सगळ्यांनाच भूक लागली होती. बरोबर आणलेला दिवाळीचा फराळाचा एकत्र बसून खात खात सगळ्यांनी आनंद घेतला. पुढे माचीवर जाण्यासाठी निघालो पण धुके इतक्या जास्त प्रमाणत होते कि समोरच काहीच दिसत न्हवत. त्यमुळे आम्ही पुन्हा घराकडे निघ्न्यचा निर्णय घेतला. पण खाली उतरण्य आधीच सगळ्यांनी ठरवल पुढचा वेळेस एक मुक्काम करण्यासाठीच यायचं. असे म्हणतात सूर्योदय आणि सूर्यास्त बघावा तर तो राजगडा वरूनच. या वेळेस परतत असताना कॅमेरा मध्ये गडाचे फोटो न्हवते पण मना मध्ये धुक्यामध्ये हरवलेला गड होता...!!
जय जिजाऊ...!!
जय शिवराय....!!!
जय शंभूराजे....!!!!  

Tuesday, 12 August 2014

एक चिम्ब प्रवास सह्याद्री च्या कुशितला..

पावसाळा सुरु झाला कि वेध लागतात ते कुठ तरी फिरयला जाण्याचे आम्ही सगळे मित्र गेले २ वर्ष झाले पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो होतो. या वर्षी हे आम्ही फिरयला जाण्याचा प्लान तयार करत होतो. प्रत्येक जन वेगवेगळ्या ठिकाणांची नावे सांगू लागला. आम्ही प्लान केला या वेळेस आपण आंबोलीला आणि दुधसागर


धबधबा पाहायला जायचं. पण तो प्लान यशस्वी नाही झाला. आणि ८ ऑगस्ट २०१४ संध्याकाळी अचानक प्लान ठरला उद्या वरंध घाटामध्ये फिरयला जायचं. आम्ही ६ मित्र आणि आमचा ३ बाईक ९ ऑगस्ट २०१४ सकाळी ९ वाजता आम्ही सगळे वरंध घाटाचा दिशेने निघालो जाताना भोर ला पोचल्यानंतर आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. चहा घेतला आणि पुढचा प्रवास सुरु केला. तसा वरंध घाट हा अम्चासाठीचा नवीन रस्ता न्हवता. खुपदा या रस्त्याने जाऊनही नेहमी हवा हवासा वाटणारा हा रस्ता जणू बोलक्या निसर्गाच्या सानिध्यात घून जाणारा वाटतो. मी खुपदा या रस्त्याने गेलो पण असे कधीच वाटल नाही कि आता या रस्त्य्ने जायचा कंटाळा आलाय. जात असताना या रस्त्यावर पहिले भाटघर धरण दिसते नंतर नीरा देवधरच धरण दिसत.
   आज पाऊस हि कमी होता मस्त उन पावसाचा लपंडाव सुरु होता. या उन पावसात भिजत त्याचा आनंद घेत आम्ही वरंध घाटात केव्हा पोचलो समजलच नाही. वरंध घाटामध्ये एक असे ठिकाण आहे कि त्या वळणावर आल्यावर कोणी थांबणार नाही असे होतच नाही. समोरच उंचच उंच डोंगर त्या मधून ते कोसळणारे धबधबे पहिले कि निसर्ग किती सुंदर आहे हे समजते. मी माझा पहिल्या ब्लोग मध्ये पण उलेख केला होता कि इकडची भाजी खूप छान असतात. आम्ही भाजी खात खात समोरचा निसर्गाचा आनंद घेत होतो. तेवढ्यात बोलत असतानाच सुहास म्हणाला इकडन खाली जाऊन प्रतापगड महाबळेश्वर वाई मार्गे घरी जाऊयात आणि लगेचच सगळे हो हि म्हणाले. मस्त धुकाय्न मधून वाट काढत आम्ही वरंध चा घात उतरू लागलो. जात असताना इतके सुंदर सुंदर धबधबे दिसत होते कि जणू असे वाटत होते कि यांची एकमेकान मध्ये जणू स्पर्धा चालू आहे. एका पेक्षा एक उंचावरून कोसळणारे धबधबे पाहून मन अगदी थक्क होत होते. वरंध चा घाट संपला आणि आम्ही पहिल्यांदाच वेगळा हवामानाचा अनुभव घेतला बारीक पाऊस पडत होता आणि गरम उबदार हवा समोरून एउन अंगाला स्पर्श करत होती. त्या वातावरणात इतक छान वाटत होते ते मी शब्दात नाही सांगू शकणार कारण काही गोष्टी या सांगण्या पेक्षा अनुभव घेण्यात काही वेगळीच मजा असते.          पोलादपूर पासून प्रतापगडला जायला रस्ता आहे आम्ही या रस्त्याने निघालो जात असताना याही बाजूला खूप उंच उंच डोंगर दिसत होते त्या मधूनही धबधबे कोसळत होते. पावसाच प्रमाण थोडे कमी असल्याने त्या मधून पाणी थोडे कमी वाहत होते. या घाट रस्त्याने जात असताना पाऊस सुरु झाला आणि आम्ही त्या मध्ये पूर्णपणे भिजलो. पावसाचे थेंब थोडे मोठे असल्यामुळे ते जोरजोरात आम्हाला लागत होते. याही घाटामध्ये आम्हाला धुक्यान मधून रस्ता शोधत गाडी चालवावी लागली. पुढे आल्यावर आम्ही जो आमचा प्लानचा मुख्य उदेश होता कि मनसोक्त दाब्धब्या मध्ये भिजायचं त्या साठी तयार झालो. आणि २ वर्षापूर्वी ज्या धबधब्या मध्ये आम्ही मनसोक्त भिजलो होतो त्या मध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनसोक्त भिजलो. भिजत धुक्यान मध्ये गाडी चालवत आम्ही महाबळेश्वरला कधी पोचलो ते हि समजले नाही. महाबळेश्वरला आल्यावर पुन्हा चहा घेतला. आणि आम्ही घरचा दिशेने निघालो.
        आम्ही पावसात धाब्धब्यान खाली भिजण्यात एवढे मग्न होतो कि आम्ही दुपारच जेवण हि केल नाही. आणि खरच निसर्गाच एवढ सुंदर रूप पाहता पाहता तहान भूक कशाकडेच लक्ष जात नाही. सह्याद्री पाहावा पावसातच, हिरवेगार गालिचे मधूनच पडणारा पाऊस, कोसळणारे धबधबे अगदी मनाला वेड लावून जातात.

Saturday, 28 June 2014

६ जून २०१४ आमचा प्रवास सुरु झाला रायगडचा दिशेने.....

 

६ जून २०१४ पहाटे ३ वाजता उठ्ठून आवरून मी माझे मित्र संघर्ष, सुहास, अजिंक्य रायगडचा दिशेने राज्याभिषेक दिनासाठी निघालो. आज मी पहिल्यांदाच रायगडावर राज्याभिषेक सोहळा कसा साजरा होतो हे पाहणार होतो, सकाळी हवाही खूप छान होती, आमचा प्रवास सुरु झाला रायगडचा दिशेने जाताना भोर पासून महाड पंढरपूर हायवे ने आम्ही रायगड कडे निघालो जात असताना या रस्त्यावर वरंध चा घाट लागतो. या घाटामध्ये चहा आणि भाजी विकणारे लोक आहे, आणि इथ थांबलो कि समोर निसर्गाचा अप्रतिम नजारा दिसतो. इथल्या चहा आणि गरम गरम भाज्जना वेगळीच चव आहे. आम्ही चहा भज्जी खाउन आमचा प्रवास पुढे सुरु केला. रायगडचा पाय्त्थ्याला पोहचणार त्या आधीच ५ किलोमीटर माणसांची गर्दी दिसू लागली सगळीकडे बघवे झेंडे घेऊन जय भवानी जय शिवाजी घोषणा देणारे कार्यकर्ते दिसत होते, एरवी शांत असलेला रायगड आज मात्र गजबजून निघाला होता. आम्ही गड चढण्यास सुरवात केली, रायगड चढायला तसा सोपा पण अंतर बरच लांब असल्यामुळे अर्ध्यात गेल्यानंतर आमचा अंगातून घामचा धारा वाहू लागल्या. बरोबर आणलेलं पाणी पण संपत आले होते. आम्ही नंतर थोडे थांबत थोडे बसत गड चढायला सुरवात केली आणि बघता बघता मुख्य दरवाजा जवळ पोचलो. पुढे गेल्यावर नागारखाण्या समोर फडकणारा झेंडा दिसला आणि पावले आपोआपच गती घॆउ लागली, कारण पहायचा होता राजायाभिषेक सोहळा. आम्हाला जायला उशीर झाल्यामुळे राज्याभिषेकाचा सोहळा आम्हाला पाहवयास नाही मिळाला.त्यामुळे मन थोडे नाराज झाले. पण नगारखान्या समोर फडकणारा तो भगवा झेंडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला केलली सजावट पाहून अंदाज एत होता कि किती मोठा सोहळा पार पडला असेल राजांचा. आम्ही महाराजांचा दर्शनासाठी गेलो आणि जणू महाराज सत्यात आमचा समोर आहेत असेच भासू लागले, किती थोर असेल हा राजा आणि किती भाग्यवंत असतील ते लोक ज्यांना महाराजान बरोबर काम करायला राह्यला मिळाले असेल. एका गोष्टीच वाईट वाटत कि आपले सरकार आपली हे इथसिक वास्तू जतन करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. नंतर आम्ही पुढे जाग्दिश्वरचा मंदिराकडे जाण्यासठी निघालो पण पुरेसा वेळ नसल्याने आम्ही टकमक टोक पाहून परतण्याचा निर्णय घेतला. टकमक टोकावरून दिसणारे ते निसर्गच सुंदर रूप डोळ्यात साठवून आम्ही घराकडे निघालो.
 ही माझी पहिलीच राज्याभिषेक सोहळ्याल जाण्याची वेळ होती, सोहळा न पाहता परत आल्याने आम्ही ठरवल पुढचा वेळेस एक दिवस आधीच जावून हा सोहळा नक्की पहायचा...
जय भवानी......!
 जय शिवाजी....!!
जय जिजाऊ.....!!!
 जय शंभूराजे....!!!!!