खूप दिवस झाले राजगडला जायचं असा प्लान आम्ही सगळे मित्र करत होतो पण त्यासाठीचा दिवस मात्र ठरत न्हवता. शेवटी दिवाळीचा सुट्टी मधला शेवटचा रविवार ठरला. आणि आम्ही १० मित्र २६ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ७ वाजता राजगडचा दिशेने निघालो. राजगडावर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत त्यातला जास्त अवघड नसलेला पालीचा दरवाजा. या दरवाजा मार्गे गडावर जायचं असेल तर पहिल्यांदा पाली गावात पोचाव लागत तेथूनच या मार्गाची सुरवात होते. भोर वरून भुतोंडे या गावात आल्यावर त्य्ही बाजूने आपणास गडावर जाता एते या मार्गाने आल्यास आपण आलू दरवाजा मार्गे गडावर पोहचतो. गुंजवणे गाव मधून गेल्यास आपण गुंजवणी दरवाजा मधून गडावर प्रवेश करू शकतो व पुढे पद्मावती माचीवर पोचतो.
थोडा अवघड असणारा पण दुर्गप्रेमीना आवडणारा मार्ग चोर दरवाजा, चोरदरवाजाने जर गडावर प्रवेश करयचा असेल तर साखर गाव पासून पुढे ३ किलोमीटर गेल्यावर या मार्गाने जाता एते. राजगड हि मराठांच्या स्वराज्यची पहिली राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी २६ वर्ष त्यंचा राज्यच कारभार या गडावरून चालवला
अशा या गडावर जाण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो. आम्ही सुद्धा गडावर जाण्यासाठी चोर दरवाजाचीच निवड केली. हवामान पावसाळी झाल्यामुळे सगळीकडे दुखच दुख पसरले होते. दुख्या मधून वाट काढत आम्ही निघालो. हि आमची पहिलीच वेळ असल्यामुळे किती अंतर वरती चढत जायचं याचा अंदाज कोणालाच न्हवता. बरेच अंतर चालल्या नंतर एकदम उभी चढण आली. दगडी मध्ये छोटय पाह्य्र्या कोरलेल्या या पाह्य्र्या चढून वरती आलो आणि एक छोटा दरवाजा समोर आलो त्यातून आत प्रवेश केला आणि आम्ही पद्मावती माचीवर पोचलो. याच त्या छोट्या दरवाजाला चोर मार्ग असे नाव आहे. पद्मावती माचीवर पद्मावती मतेच मंदिर आहे, बाजूलाच रामेश्वरच देखील मदिर आहे. आम्ही सगळे पद्मावती मातेचा मंदिरात बसलो. गड चढल्या नंतर सगळ्यांनाच भूक लागली होती. बरोबर आणलेला दिवाळीचा फराळाचा एकत्र बसून खात खात सगळ्यांनी आनंद घेतला. पुढे माचीवर जाण्यासाठी निघालो पण धुके इतक्या जास्त प्रमाणत होते कि समोरच काहीच दिसत न्हवत. त्यमुळे आम्ही पुन्हा घराकडे निघ्न्यचा निर्णय घेतला. पण खाली उतरण्य आधीच सगळ्यांनी ठरवल पुढचा वेळेस एक मुक्काम करण्यासाठीच यायचं. असे म्हणतात सूर्योदय आणि सूर्यास्त बघावा तर तो राजगडा वरूनच. या वेळेस परतत असताना कॅमेरा मध्ये गडाचे फोटो न्हवते पण मना मध्ये धुक्यामध्ये हरवलेला गड होता...!!
जय जिजाऊ...!!
जय शिवराय....!!!
जय शंभूराजे....!!!!
जय जिजाऊ...!!
जय शिवराय....!!!
जय शंभूराजे....!!!!

No comments:
Post a Comment